तुम्ही आम्ही सकल हिंदु
तुम्ही आम्ही सकल हिंदु | बंधूबंधू
तो महादेवजी पिता आपुला चला त्या वंदू || ध्रु ||
ब्राम्हण वा क्षत्रिय चांग | जरि झाला
कसलेंहि रूप वां रंग | जरि ल्याला
तो महार अथवा मांग | सकलांला
ही अेकचि आअी हिंदुजाति | आम्हास तिला वंदूं
अेकची देश हा अपुल्या | प्रेमाचा
अेकची छंद जिवाच्या | कवनाचा
अेकची धर्म ही आम्हां | सकलांना
ही हिंदुजातिची गंगा आम्ही तिचे सकल बिंदू
रघुवीर रामचंद्राचा | जो भक्त
गोविंदपदांबुर्जि जो जो | अनुरक्त
गीतेसि गाअुनी पूजी | भगवंत
तो हिंदुधर्मनौकेत बसुनिया तारतो भवसिंधु
अुभयांनि दोष अुभयांचे | खोडावे
व्देषासि दुष्ट रुढीसी | सोडावें
सख्यासि आअिच्यासाठी | जोडावें
आम्ही अपराधांसी विसरुनि प्रेमा पुन्हा पुन्हा सांधू
लेकुरें हिंदुजातीचीं | हीं आम्ही
आमुच्या हिंदुधर्मासी त्या कामीं
प्राणही देअुनी रक्षू | परिणामीं
यां झेंड्याखाली पूर्वजांचिया अेकाची नांदूं
रत्नागिरी १९२५