poem014

वीर सावरकरांची आरती

स्वातंत्र्य वीरा तुझी आरती
शशी सूर्य ओवाळती भारती ||
तू देशबंधू तू धैर्य सिंधू
हे आर्यपुत्रा तू मात्र हिंदू
तळपे त्रिखंडी तुझी दिव्य दीप्ती
क्रांतीरथी तू महासारथी ||
तू मायमुक्ती तू राष्ट्रशक्ती
साक्षात् स्वयंभू तू देशभक्ती
गृह, वित्त, मत्ता, धन, दार, कीर्ती
स्वातंत्र्ययज्ञी दिली आहुती ||
महाकाव्य वक्तृत्व विज्ञान वाणी
विलसे तुझी लेऊनी वज्रलेणी
तुझी लेखणी खड्ग राष्ट्रार्थ झाली
शत्रुंजयी शब्द समशेर ती ||
तुझी गाजलेली त्रिखंडी उडी ती
उभी विक्रमी रे दिगंती गुढी ती
तो कोलू काथ्या सजा अंदमानी
चिरंजीव वीरा तुझी वीरवृत्ती ||
मृत्युंजयी विक्रमी वीरगाथा
हृदयी विराजे तुझी राजसत्ता
नाशावया विस्मृती घोर भ्रांती
ये जन्म घेईन पुन्हा भारती ||

श्रीनिवास शिंदगी

Back to song list