poem002

जगन्नाथाचा रथोत्सव

महाराज, आपुली कथा ना कुठें निघे स्वारी
ऐश्वर्ये भारी । ह्या अशा । ऐश्वर्ये भारी
दिक् क्षितिजांचा दैदीप्य रथ तुझा सुटता
ह्या कालपथाच्या अतुट उतरणीवरता
नक्षत्रकणांचा उठे धुराळा वरता
युगक्रोश दूरी । मागुती । युगक्रोश दूरी
महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी? – २ –
ह्या सूर्यशतांच्या किती मशाली जळती
मधुनीच शतावधि चंद्रज्योति ह्या अुडती
सरसरत बाण हे धूमकेतुचे सुटती
कितिदां आणि तरी । हीहि तैं । कितिदां आणि तरी
उठे चमकुनी रात्रि पुरातन तिच्या अंधकारी – ३ –
जीवाचीच किती । कथा ह्या । जीवाचीच किती
रथासी जगन्नाथ, तुझ्या ह्या ओढूं जे झटती
उंचनिच पाठीं । पुढति वा । उंचनिच पाठीं
गति तितुकी तव रथ झटतसे ओढायासाठी
इच्छांत आणि ह्या भूतमात्र वेगांच्या
ओंवून लगामा तुझ्या परम इच्छेच्या
त्या अतुट उतरणीवरती हो काळाच्या
खेळत हा अतली। रथोत्सव । खेळत हा अतली
महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?– अंदमान

Back to song list