छंद नसे चांगला
(परिचय- ही लावणी एका तमासगीर फडास करुण दिल्यापैकी आहे)
स्त्री :- छंद नसे चांगला गड्या रे छंद नसे चांगला
मन्मन – मित्राच्या कासारा गणिकेचा हा तुला
छंद नसे चांगला गड्या रे छंद नसे चांगला
पति :- प्रेमें घाली कंठी हस्ता नखरे करते किती
स्त्री :- नव्हे ति नडग१ नखे मारिती
जर खिसा खुळखुळे म्हणेल तरि मग बसा
ना तरी ढुंकूनी पाहिलं ना अवदसा
पति :- मम पद घेवुनि हळूच चुरते मृदहस्तें कोमला
कशी ति ठकविल सुंदरि मला
स्त्री:- खायास मिळेल न कवडीही तुज जई
पडशील सडूनियां, हसेल जग हे तई
परमर्दन तें दूरचि राहो पैशास्तव प्रियकरा
ओढील बाजारीं फरफरा !