फटका- श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग
जिकडे तिकडे नाम पेशवे काल शत्रूसी वाटुनीयां |
प्रजेंत झाली बहु शांतता रिपू सर्व हे हटूनियां || ४
नाच शिकारी रंग तमाशे प्रजेंत होती नित्य पहा |
श्रीमंतांनीं बेट ठरविला रंग करावा असा महा || ५
रायाचा कल पाहुनि सर्वहि देती सत्वर रुकारा |
हर्ष होतसे वर्षप्रतिपदे पुण्यांत झाला पुकारा ||
हत्ती घोडे फौज असा हा समाज सर्वचि मिळाला |
आज्ञा केलि श्रीमंतें मग सुरुवात करा खेळायला || १०
पुढे विलसते मुख्य स्वारी सर्वे तहात अंबाऱ्याचा |
चंद्रविंब श्रीमंत अवांतर प्रकाश पडला ताऱ्यांचा || १३
पिचकार्यांशचा मार तेधवां फार जाहला बुधवारी |
स्वारी कापडआळींतुनी खेळत आळी रविवारीं || १४
सलाम मुजरे सर्व राहिले दंग जाहले रंगांनी |
व्दापारिं जसे रंग करविले भगवान श्रीरंगांनीं || १७
हरीपान्ताचे वाड्यापाशी रंग केशरी उडवुनिया |
स्वारी गेली नागझरींतुन रंग केशरी तुडवूनीयां || १५
रास्ते यांचे पेठेमध्यें पाट लागले रस्त्यांनी |
गच्च्यांवरुनी बंब लावुनी रंग उडविला रास्त्यांनी || १६
शहरिं भिजवले कैक बंगले चौक गुलालें रंगांनी |
व्दापारिं जसे रंग करविले भगवान श्रीरंगांनी || १७
झुकत झुकत समुदाय चालती स्वारी ये मग वानवडी |
नंतर रंगा आरंभ झाला नाच होऊनी दोन घडी || १८
दों दों हातीं गुलाल भरती लाल छात दिसे बुंदांत |
हास्यवदन मग राव शोभती शूरशिपाईवृंदांत || १९
लाखों हौदे उडूं लागले पिचकाऱ्यांचा मार अती |
झालि रे झाली गर्दी एकचि वर्णावी ती पहा किती || २०