poem013

तनुवेल

सकाळीच तू तोडित असता जाअीजुअिच्या फुलां
माडीवरूनी सुंदर कन्ये, पाहियलीं मीं तुला
अुंचविता कर छातीवरि ये चोळी तटतटूनी
कुरळ केश रूळताति गोरट्या मानेवरि सुटुनी
पदर खोवले पातळ गेलें कटितटिला लगटूनी
स्मृति सखये तव मनीं माझिया संगतिच्या अुठूनी
बघसि चोरटे मी तुज दिसतो वरती कां कुठुनी
दिसतांची मी हंसूं अूषेसम मुखिं तव ये फुटुनी
माडीवरूनी सुंदर कन्ये, पाहियलीं मीं तुला
अशी सकाळी फुलें तोडितां पाहियलीं मीं तुला
फुलवेलीहुनि तनुवेलचि तव मोहकदिसली मला !

Back to song list