poem006

ध्वजगीत – अखिल हिंदु ध्वज हा

अखिल हिंदु ध्वज हा अुभवू या पुन्हा || ध्रु ||
ह्या ध्वजासची त्या काली | रोविती पराक्रमशाली
रामचंद्र लंकेवरती | वधुनि रावणा
करित जें शिकंदर स्वारी | चंद्रगुप्त ग्रीनका मारी
हिंदुकुश – शिखरी चढला | जिंकुनी रणा || १ ||
रक्षणी ध्वजाच्या ह्याची | शालिवाहनाने साची
उडविली शकांचि शकलें | समरिं त्या क्षणा
जअिं जअिं हिंदु सम्राटें | अश्वमेध केले मोठे
करित पुढति गेला हाची | विजयघोषणा || २ ||
पुढति नेम कांही ढळला, ध्वज जरि करांतुनी गळला
अुचलुया पुनरपि प्राणा लावुनी पणा || ३ ||

Back to song list